सर हम्फ्रे डेव्ही

            सर हम्फ्रे डेव्ही

(जन्म : १७-१२-१७७८, मृत्यू : २९-०५-१८२९)
ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ. जन्म कार्नवाल परगण्यात पेंझॅन्स येथे झाला. लहानपणापासून रसायनशास्त्राची आवड. निरनिराळया वायूंच्या श्वसनाने होणाऱ्या परिणामासंबंधी प्रयोग. त्यातून नायट्न्स ऑक्साईड वायू वेदनाहारक असल्याचा शोध. वीज प्रवाहाने अनेक रासायनिक संयुगाचे पृथ:क्करण केले आणि सोडियम, पोटॅशियम नि मॅग्नेशियम हे धातू तयार केले. कोळशाच्या खाणीतील ज्वालाग्राही वायू यांचे अस्तित्व ओळखण्यासाठी `डेव्ही संरक्षक दीप' तयार केला.

Hits: 973