जेष्ठ शास्त्रज्ञ प्रा. यशपाल यांचे निधन

Yashpal

जेष्ठ शास्त्रज्ञ, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष प्राहोते. नोएडा येथील रुग्णालयात त्यांनी . यशपाल यांचे निधन झाले. ते ९० वर्षांचे अखेरचा श्वास घेतला.

प्रा. यशपाल शास्त्रज्ञ आणि शिक्षण तज्ञ म्हणून भरीव योगदान दिले. प्रा. यशपाल यांनी योजना आयोगाचे सल्लागार, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव म्हणून जबाबदाऱ्या पार पाडल्या. टाटा मूलभूत संशोधन संस्थेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. अंतराळ विषयक मोहिमांसाठी भारत सरकारने १९७२ साली स्थापन केलेल्या अंतराळ अनुप्रयोग केंद्राचे प्रा. यशपाल पहिले संचालक होते. विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष असताना त्यांनी महत्त्वाची पाऊले उचलली होती. केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्रालयाने २००९ साली उच्च शिक्षणातील बदलासंदर्भात त्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना पद्मविभूषण आणि पद्मभूषण या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Ref : News - Maharashtra Times | Jul 25, 2017

Hits: 269