शास्त्रीय कारणे द्या. (२१ - ४०)

खालीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर वा अशाचप्रकारची अधिक उदाहरणे ज्ञानदीपकडे ( This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.)पाठवा त्यास आपल्या नावासह प्रसिद्धी देण्यात येईल.

२१ रेल्वेच्या डब्यांना जोडताना स्प्रिंगचे बफर वापरतात.
२२ फुगा उंच गेल्यास फुटण्याचा धोका असतो.
२३ खेळाडूंच्या बुटांना खिळे असतात.
२४ मांजराच्या अंगावरून हात फिरविल्यास त्याचे केस ताठ होतात.
२५ धु्रव ताऱ्यामुळे दिशा कळते.
२६ पाण्याचा भोवरा नेहमी एकाच दिशेने फिरतो.
२७ फुले रंगीत व सुगंधी असतात.
२८ फुलपाखरांचे रंग व आकार फुलांच्या पाकळयांप्रमाणे असतात.
२९ पाण्यावर रॉकेल घातल्यास डासांच्या अळया मरतात.
३० चंद्राच्या कला दिसतात.
३१ उगवताना व मावळताना सूर्य लाल व मोठा दिसतो.
३२ वाळवंटात मृगजळ दिसते.
३३ वटवाघळे रात्रीच्या अंधारातही व्यवस्थित उडू शकतात.
३४ फोडणीच्या वेळी मोहरी तडतडते.
३५ अबोलीच्या शेंगा पाणी लागले की तडकतात.
३६ वादळामुळे झाडे पडतात, पण छोटी झुडपे सुरक्षित रहातात.
३७ पाण्याबाहेर काढले की मासे मरतात.
३८ कागदाच्या द्रोणात पाणी तापविले तर पाणी उकळले तरी कागद जळत नाही.
३९ विस्तवावरून पायांना इजा न होता चालता येते.
४० हिवाळयात दंव पडते.

 

Hits: 52