शास्त्रीय कारणे द्या. (१ - २०)
खालीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर वा अशाचप्रकारची अधिक उदाहरणे ज्ञानदीपकडे ( This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.)पाठवा त्यास आपल्या नावासह प्रसिद्धी देण्यात येईल.
१ विजेच्या तारांवर चिमणी बसल्यास काही होत नाही, मात्र वटवाघूळ बसल्यास ते मरते.
२ साधे अंडे गोल फिरविले तर नीट फिरत नाही,मात्र उकडलेले अंडे नीट फिरते.
३ आइसक्रीम करताना भोवताली खारे पाणी वापरतात.
४ बारीक व्यासाची नळी पाण्यात बुडविली तर नळीत पाणी वर चढते.
५ पाण्यातील रंग, वास काढण्यासाठी सक्रीयीकृत कोळसा वापरतात.
६ पृथ्वीवरून पाहताना आकाशाचा रंग निळा असतो, मात्र पृथ्वीपासून दूर गेल्यास आकाश काळे दिसते.
७ उन्हाळयात पांढरे तर हिवाळयात काळे कपडे वापरावेत.
८ बेदाणा पाण्यात टाकल्यास फुगतो मात्र द्राक्ष साखरेच्या पाकात टाकले तर आकसते.
९ भट्टीजवळ काम करणाऱ्यांना मिठाचे पाणी प्यायल्यास बरे वाटते.
१० ग्रहांचा प्रकाश स्थिर असतो पण तारे लुकलुकतात.
११ रेल्वेच्या रूळांमध्ये फट ठेवलेली असते.
१२ तापमापकासाठी पारा वापरतात.
१३ वीजवहनासाठी तांब्याची तार वापरतात.
१४ विजेच्या दिव्यात टंगस्टनची तार वापरतात.
१५ विजेचा प्रकाश आधी दिसतो मात्र आवाज नंतर ऐकू येतो.
१६ दिवा जळत असताना वातीतून तेल वर चढते.
१७ सर्व प्राण्यांचे डोळे काळे असतात.
१८ माणूस पूर्ण अदृश्य केला तर तो आंधळा होईल.
१९ सूर्यफूलाचे तोंड नेहमी सूर्याच्या दिशेने रहाते.
२० चेंडू जमिनीवर आपटला तर उसळी घेऊन वर येतो.
Hits: 29