शास्त्रीय कारणे द्या. (४१ - ६०)

खालीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर वा अशाचप्रकारची अधिक उदाहरणे ज्ञानदीपकडे ( This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.)पाठवा त्यास आपल्या नावासह प्रसिद्धी देण्यात येईल.

४१ बाहेर पाऊस पडत असला तर खिडकीची काच आतून धुरकटते.
४२ पाण्याने भरलेल्या ग्लासवर काडबोर्ड ठेवून ग्लास उलटा केला तरी पाणी खाली पडत नाही.
४३ मृत्यु गोलातील मोटार सायकल उलटी होऊनही पडत नाही.
४४ वळणावर रस्त्याचा पृष्ठभाग तिरका केलेला असतो.
४५ मांजर अंधारात पाहू शकते.
४६ प्राण्यांचे डोळे अंधारात चमकतात.
४७ दूधाचा रंग पांढरा असतो.
४८ दही घुसळते की लोणी वर येते.
४९ लोण्यापेक्षा तूप जास्त दिवस टिकते.
५० सात रंगाची चकती फिरविल्यास पांढरी दिसते, मात्र तेच रंग एकत्र मिसळल्यास काळा रंग तयार होतो.
५१ आखाती प्रदेशात लोक पांढरे पायघोळ कपडे वापरतात.
५२ वाळवंटातून उंट सहजपणे लांब प्रवास करू शकतो.
५३ विजेमुळ माणसापेक्षा गायीसारख्या प्राण्यांना जास्त धोका संभवतो.
५४ पावसाळा सुरू झाला की बेडकांचा डराव डराव आवाज सुरू होतो.
५५ पहिल्या पावसाने मातीचा सुगंध पसरतो.
५६ मुंबईतल्या इमारतींचे रंग लवकर खराब होतात.
५७ आकाशात ढग आले की दमेकरी माणसास त्रास होळ लागतो.
५८ अंगात ताप आला तर कपाळावर मिठाच्या पाण्याची पट्टी ठेवतात.
५९ पोहताना पाणी मागे सारले की पुढे जाता येते.
६० दगड हवेत उंच फेकला तरी तो खाली येतो.

 

Hits: 31