नागेश व्यं. घोलबा

आपल्यातील एक परंतु असामान्य श्री. घोलबा(सर)

सांगली शहर आणि जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रावर ज्या काही निवडक गुरुजनांचा ठसा उमटला आहे. जवळ जवळ गेली चार तपे या परिसरातील विध्यार्थ्यात अत्यंत आदराने ज्यांचा आवर्जून नामोल्लेख होतो आहे अशा आदरणीय आणि विद्यार्थीप्रिय बोटावर मोजता येतील अशापैकीच एक सकल कलागुण संपन्न, अत्यंत शिस्तबध्द करडे परंतु विद्यार्थ्यावर मायेची पाखर घालणारे, त्यांच्यावर पुत्रवेत प्रेम करुन त्यांना सुसंस्कारित करण्याकरिता निरनिराळ्या उपक्रमांची परिसीमा गाठणारे. वर्गात खडू-फळा, दृक्‌-श्राव्य शिक्षण साहित्य, प्रयोगशाळेतील उपकरणे, भूगोल, नकाशे, भाषाशास्त्र, विज्ञान विषयात तल्लीन होणारे, आणि आपल्याबरोबरच आपले विद्यार्थी आणि सहपाठी, सहकारी शिक्षक सर्वाना त्यांत एकरुप करुन घेणारे आणि तितकेच वर्गाबाहेर क्रीडा मैवानावर, लाठी, काठी, फरीगदगा, लेझीम, क्रिकेट, टेबलटेनिस, बॅडमिंटन, व्हॉलिबॉल, बास्केट्बॉल, वगैरे सारख्या देशी-विदेशी खेळात नुसते उत्कृष्ट खेळाडू म्हणूनच नव्हे तर, पहिल्या आशियाई सामन्यात १९५१ साली अथॅलेटिक्ससाठी एक पंच, मुं.शालेय सामन्यात संचालक, शिवाजी विद्य़ापिठाचे झोनल इंटर झोनल प्रमुख निवडसमिती सभासद, आफ्तर विद्यापीठ टे.टे. साठी शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापक, कर्नाटक विद्यापीठ सामन्यात कप्तान. विज्ञान प्रदर्शने भरविणे पेपर सेटर परीक्षक, मॉडेटर, जवळ जवळ दोन तपात २२ शिक्षक मार्गदर्शक शिबिरे शास्त्र शिक्षक संघटन, एवढेच नव्हे तर शालेय आणि विद्यापिठिय रंगभूमिवर एक उत्कृष्ठ कलाकार दिग्दर्शक, अशा अनेक पैलू मधून आपल्या सर्वगुण संपन्न्तेचा लाभ विद्यार्थि, शिक्षण संस्था आणि शिक्षण क्षेत्राला देणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्व गुरुवर्य नागेश व्यं. धोलबा(सर).

शैक्षणिक शास्त्र साहित्य विभागात पहिल्याच वर्षी भारत सरकारच्या एन्‌.सी.ई.आर.टी. चे पहिले पारितोषिकच सरांनी नुसते मिळवले नाही तर सेवानिवृत्तीनंतर आज सत्तरीच्या घरात असूनही पूर्वी इतक्याच उत्साहाने आणि शैक्षणिक तळमळीच्या भावनेने सावरकर प्रतिष्ठान तर्फे प्रज्ञाशोध परीक्षा तयारी वर्ग सुरु करण्यात प्रामुख्याचा सहभाग घेतला. पहिल्या तीन वर्षात १२ तर ९२ साली प्रतिष्टानचे सात विद्यार्थी प्रज्ञाशोध परीक्षेतील पारितोषिक विजेते ठरले. घोलबासरांचे अनेक शैक्षणिक संस्थांना मार्गदर्शन. आणि आपल्या गेल्या चार तपातील विद्यार्थ्याच्या पाल्यांना मार्गदर्शनही अखंड सेवाव्रताप्रमाणे चालू आहे.

इतके सर्व व्याप संभाळून पुन्हा फावल्यावेळी सरांचे हात चित्रकला, फोटोग्राफी, कोरीवकाम, शिवणकाम, सुतार काम, बागकामातही गुंतलेले पहायला मिळतील. घराच्या भिंतीदेखील सरांच्याच हातांनी रंगनिल्या जातील. हातात आलेल्या तेलगु, कानडी, इंग्रजी, मराठी ग्रंथांचा वाचनाबरोबरच त्यांतील नोट्स्‌ घेणे आणि आलेल्या विद्यार्थी – पै पाहुण्यांबरोबर आपल्या खास मिष्कील विनोदी शैलीत रममाण होणे हे केवळ या कर्मयोग्यालाच साध्य होऊ शकते.

सांगली पासून ते पलूस, पुणे,अलिबाग पर्यत ज्यांचे विद्यार्थी नमवंत डॉक्टर्स म्हणून प्रसिध्द आहेत. शिक्षण क्षेत्रात ज्यांचे विद्यार्थी आज अनेक ठिकाणी मुख्याध्यापक, प्राध्यापक म्हणून ख्यातकीर्द आहेत. बॅंक्स, इलेक्ट्रोनिक्स, शिल्पशास्त्र, इंजिनिअरिंग, औषध उत्पादन, केमिकल इंजिनिअरिंग, कॉस्ट अकौंटन्सी आणि वकिली व्यवसायात अनेक ठिकाणी अनेक लोक आपल्या पद आणि पदवी इतकाच आमचे घोलबा सर म्हणून ज्यांचा आदर पूर्व उल्लेख करतात आणि सुधीर मोघ्यांसारखा कलाकार आपल्या कलांकार घडणीत घोलबासरांचा महत्वाचा वाटा आहे. म्हणून अभिमानाने सांगतो त्या नेरुरला जन्मलेल्या घोलबासरांनी शिक्षण कालांत वडिलांच्या रेल्वेतील फिरत्या नोकरीमुळे मद्रास, विजवाडा येथे ५ वी पर्यंत तेलगू भाषेत शिक्षण घेण्यात व्यतीत केले व बेळगांव येथे बी.एस्‌.सी. नंतर १० वी पर्यंत कानडी माध्यमातून अध्यापन केले. म्हणून सांगितले तर एखाध्याला खरेही वाटणार नाही. जरंतु तेलगू भाषेतून शिक्षणाची सुरुवात झालेली असतांना देखील नंतर मराठी माध्यमातून त्यांनी मुंबई विद्यापीठाची मॅट्रिक, भौतिक विषय घेऊन बी.एस्‌.सी. पुढे शास्त्र शिक्षक म्हणून शिक्षण क्षेत्रात असतांनाच डी.पी.एड्‌, बी.एड्‌ च्या पदव्याही वरच्या क्रमांकाने मिळवल्या. युनिव्हर्सिटी ग्रॅंट्स्‌ कमिशनच्या उन्हाळी वर्गात केमिस्ट्री उपमुख्यापकात पहिल्या पाचात नंबर मिळवला. निरनिराळ्या शिक्षण संस्थांतून अध्यापक, उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक पदे भूषविली. एवढेच नव्हेतर एस्‍.टी.सी. चे प्राचार्य पद, बी.एड्‌. कॉलेज मध्ये गणीत, शास्त्र, भूगोल, शा. शिक्षक. दृक-श्राव्य शिक्षणाच्या लेक्चरर पदाबरोबरच मेथड मास्टर म्हणूनही कारर्किर्द गाजविली. ८१ साली नोकरीतील नियमानुसार उपमुख्याध्यापक पदावरुन सेवानिवृत्ती स्विकारली. तरी शिक्षण क्षेत्र मात्र त्यांना पुन्हा साद घालीत असतेच.

आणि शिक्षण क्षेत्रातला असामान्य असा ह गुरुवर्य भावी पिढीसाठी बहुमोल असे आपले शैक्षणिक योगदान पहिल्याच उमेदीने हसत मुखाने करीत आहे. त्यांचे सर्वक्षेत्रातील गेल्या चार तपातील शिष्य आपली भावी पिढीही घोलबासरांकडून घडावी म्हणून त्यांना साकडे घालीतच असते. आणि आपल्या आई-वडीलांच्या अत्यंत आवडत्या घोलबासरांकडे नवीन पिढी आदरणीय भावनेने धडे घेत असते. आपापल्या शिक्षण संस्थात प्राविण्य संपादित असते.

म्हणूनच आदर्शाच्या शोधात असलेल्या पिढीच्या वतीने गुरुवर्य नागेश व्यं. घोलबासर यांना म्हणावयाचे नागेशं नमस्कृत्य! गुरुवर्य नमस्कृत्य ! नमस्कृत्य ! नमस्कृत्य !

स्वपरिचय -

सांगली शिक्षण संस्थेत १९४७ साली आल्यावर.

  1. १९४७ ते १९५७ किर्लोस्कर हायस्कूल किर्लोस्करवाडी
  2. १९५७ ते १९६१ म.गांधी विद्या मंदिर विटे.
  3. १९६१ ते १९७१ हि.हा.रा.चिंतामणराव हायस्कूल सांगली, बी.एड्‌. कॉलेज, सांगली.
  4. १९७१ ते १९७४ तासगांव हायस्कूल, तासगांव.
  5. १९७४ ते १९८१ सिटी हायस्कूल सांगली – सेवा निवृत

 

सन १९६१ साली सांगलीतील सर्व शाळातील शास्त्रशिक्षकांची संघटना करुन दरमहा एका शाळेत शास्त्र शिक्षकांचा मेळावा घेणे व आभ्यासातील दृष्टीकोन अमलात आणला. सांगलीतील शाळातील शास्त्र विभागाचे प्रदर्शन भरविले व १९६८ साली पांच जिल्ह्यातील शाळातील मुलांच्या शास्त्र साहित्याचे भव्य प्रदर्शन भरविले. शिवाजी विद्यापीठाचे रसायन शास्त्राचे प्रमुख डॉ.
यांचे हस्ते पारितोषिक वितरण केले त्यात श्री. घोलबा यांच उपकरणे विभागातील प्रथम पारितोषिक मिळाले. या प्रदर्शनाला त्यावेळचे नेते मा. वसंतदादा पाटील यांनी प्रदर्शनाला भेट देऊन कौतुक लेले त्याच प्रमाणे दरमहा शास्त्रशिक्ष्काची वेगवेगळ्या शाळामध्ये एकत्र भेट घेऊन शास्त्रावर चर्चा घडवून आणण्याचे कार्य सुरु केले.

किर्लोस्करवाडीत, शास्त्र व गणित विषया बरोबर भूगोल वरही अधिक लक्ष दिले. किर्लोस्करवाडीच्या कारखान्याचे प्रमुख श्री. शंकरराव किर्लोस्कर यांच्या प्रोत्साहनामुळे अनेक विभागात पुढाकार घेण्य़ाची संधी मिळाली. विविध खेळ क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस, शारीरिक शिक्षक दृक-श्राव्य शिक्षणा साठी भारतातील परदेशी कंपन्याशी संधान साधून दृक-श्राव्य शिक्षणा साठी आवश्यक असलेल्या १६ मि.मि. सिनेमाच्या फिल्म मिळविल्या. व त्याचे शालेय व कारखान्याच्या वसाहतीमध्ये प्रसारण करण्यात आले. याचा फायदा फार मोठ्या प्रमाणात शैक्षणिक क्षेत्रात झाला. त्याच प्रमाणे वसाहतीतील करमणुकीच्या कार्यक्रमात भाग घेण्यास एकांकिका, नाट्य्प्रयोग यांत प्रमुख भूमिका करावयास मिळाल्यामुळे, या विभागातही प्रगती करणे शक्य झाले. येथेच टेनिस खेळातील चॅम्पियनशिप मिळविली. क्रिकेट संघातून विविध ठिकाणी प्रामुख्याने उगारखुर्द, मद्रास वगैरे ठिकाणी खेळावयास मिळाले.

‘सागलीत पटवर्धन हायस्कूल मध्ये काम करताना फार मोठा अनुभव मिळाला मोठ्या शाळेचे संचालन, मुलाना मर्गदर्शन मोठ्या प्रमाणात – असंख्य पारितोषीके मुलांना मिळवून दिली त्याच वेळी बी.एड्‌ कॉलेज मध्ये अनेक विषयांचे मार्गदर्शन, पाठ मार्गदर्शन, खेळांचे मार्गदर्शन – शिवाजी युनिव्हरसिटीच्या झोनल व इंटर झोनल सामन्यांचे संचालन – शिक्षकांना मर्गदर्शन व त्याना उपकरणांचे मार्गदर्शन व त्या मुळे विद्यापीठाची पारितोषिके शिक्षाकांना मिळाले. N.C.E.R.T. चे पहिल्या वर्षी शास्त्रईय उपकरणाला पारितोषीक मिळालेच पण त्या नंतरही शिक्षकांना परीक्षेच्या वेळी वैशिष्ट्य्पूर्ण शास्त्र व भूगोल उपकरणे मिळाल्याने विद्यापीठात अनेक शिक्षकांना उच्य श्रेणी मिळाले.

१९७२ साली तासगांव हायस्कूल तासगांव येथे शाळा प्रमुखाचे कार्य करीत शास्त्र व गणित विषयांचे मार्गदर्शन करत असताना N.C.E.R.T. विभागाचे भारतातील शास्त्र विभातातील पहिल्या वर्षाचे शास्त्रीय उअपकरण विभागातील पहिले पारितोषीक Light- 0 – scope ला मिळाले.

१९८१ ला निवृत्ती नंतर स्वा. सावरकर प्रतिष्ठान सांगली येथे NCERT तर्फे घेण्यात येणार्‍या प्रज्ञाशोध परीक्षेची तयारीचे वर्ग सुरू केले. या वर्गात Mental Ability चा १०० गुणाची तयारी घेण्याची जबाबदारी घेतली व शंभरावर प्रशिक्षीत स्कॉलर तयार झाले आहेत. तसेच शिक्षकही तयार केले आहेत.

पटवर्धन हायस्कूल, सांगली येथे कार्यरत असताना शालेय शिक्षणात फेरबदल करण्याची योजना भारत सकारने जाहीर केली होती न ही योजना अमलात आणण्यासाठी भारत सरकारने समरिन्स्टिट्यूट – शैक्षणिक मर्गदर्शन करण्यासाठी भारतात शास्त्र, गणित वगैरे विअषयांची शिबिरे घेण्याची तयारी केली. त्यानी रसायन शास्त्राच्या शिबिरासाठी माझी निवड झाल्याने L.I.T. Nagpur येथे मर्गदर्शना साठी गेल्यावर प्रायोगिक विभातातील माझ्या कामाची पहाणी केल्यावर आलेल्या अमेरिकन तज्ञ शिक्षकाना माझ्या कौशल्याची जाणीव झाली व त्यानी शिबिरातील इतर शिक्षकाना मार्गदर्शना साठी माझी निवड केली. या शिबिराच्या प्रायोगिक विभावावर खुपच चांगला परिणाम झाला. आलेल्या प्राध्यापकानी माझ्या कामाचे खूपच कौतुक केले नकळत या शिबिराचा मला खूप फायदा झाला.

-नागेश व्यंकटेश घोलबा

Hits: 26