गुप्तहेर

‘पोखरान क्षेत्रात भारताची अणुस्फोटाची तयारी सुरू - अमेरिकेत प्रसिद्ध झालेले वृत्त’

डॉ. केळकर वृत्तपत्रातील ती बातमी पुनःपुन्हा वाचत होते. त्यांच्या मनात विलक्षण खळबळ माजली होती. अणुशक्ती विभागातील प्रमुख सुरक्षा अधिकारी म्हणून ते गेली १० वर्षे काम करीत होते. परंतु ही बातमी वाचून त्यांना आपल्या सर्व कामगिरीवर पाणी पडल्यासारखे वाटले. पोखरान विभागाची पाहणी करून परत मुंबईत पोहोचेपर्यंत अशी बातमी अमेरिकेत प्रसिद्ध होते म्ह्णजे त्यांच्या कार्याला काळिमा आणणारी आणि त्याहीपेक्षा राष्ट्राच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय गंभीर बाब होती.

त्यांनी चष्मा काढून कपाळावरचा घाम पुसला. डोक्यात विचारचक्र जोरात सुरू झाले होते. आपल्याबरोबर असलेले कॅप्टन डेसूझा, असिस्टंट वागळे आणि भौतिक विभाग प्रमुख डॉ. शर्मा यांची ते मनातल्या मनात उलटतपासणी घेऊ लागले. पन हे सर्व त्यांचे पूर्वीपासून माहितीचे व विश्वासू असल्याने त्याच्याविषयी काही संशयासही वाव मिळेना. कदाचित ऑफिसमध्ये स्टेनो टायपिस्ट, क्लार्क यांच्याकडूनही ही बातमी फुटली असेल. आता पुढे काय करायचे. हा विचार मनात येताच त्यांनी फोन उचलला व सतर्कता अधिकारी इन्स्पेक्टर माने यांना फोन लावला.

‘ हॅलो मिस्टर माने. मी केळकर बोलतोय. आजच्या लोकसत्तेतील पहिल्या पानावरील बातमी वाचलीत. फार सीरीयस गोष्ट आहे. ऑफिस स्टॉफ व सारा प्रकल्प ग्रुप या सर्वांवर नजर ठेवा. मीही याबाबतीत काय करायचे याचा विचार करतोच आहे.’

‘मला आत्ताच मिनिस्ट्रीकडून फोन आला होता. आमचे इन्व्हेस्टीगेशन चालू झाले आहे’ असे म्हणून मानेनी फोन बंद केला.

केळकरांच्या डोक्यात असंख्य विचारांचे थैमान सुरू झाले. अणुशक्तीच्या विभागात घातपाताचे प्रयत्न यापूर्वीही झाले होते. परंतु हेरगिरीचा हा प्रयत्न नवीनच होता. नाही म्हणायला गेले सहा महिने असे छोटे छोटे तुरळक प्रकार होत होते परंतु त्याकडे इतके गंभीरपणे पाहिले गेले नाही असे केळकरांच्या लक्षात आले. आता मात्र त्या सर्व गटनाम्चि संगती लागत होती.

हवेत गारवा असला तरी केळकरांना भयंकर उकडत होते. फ्रीज उघडून त्यातली गार पाण्याची बाटलीच त्यांनी तोंडाला लावली. बाहेरचे गार वारे आत यावे म्हणून खिडकी उघडली व पडदा बाजूस सरकवला. बिल्डींगच्या खाली कोपर्‍यावर एक निळी गाडी उभी होती. असली गाडी केळकरांना पूर्वी कधीच दिसली नव्हती. केळकरांची खिडकी उघडताच गाडी सुरू झाली व लांब गल्लीच्या टोकाला पानाच्या दुकानासमोर थांबली. केळकरांना शंका आली. त्यांनी प्रथम पडदा परत लावला व दिवा बंद केला. पडद्याच्या फटीतून ते खाली रस्त्यावर पाहू लागले. त्यांची शंका खरी ठरली. गाडीतील दोन माणसे पुन्हा गाडीत बसली व परत गाडी त्यांच्या घराखाली येऊन थांबली.

केळकरांना आठवले. पूर्वी एक शास्त्रज्ञ अचानक बेपत्ता झाला होता. तब्बल आठ दिवसांनी भ्रमिष्ठ अवस्थेत मरीन ड्राईव्हवर हिंडताना सापडला पण त्याची सर्व स्मृती गायब झाली होती. असेच काहीतरी षडयंत्र असावे.

पण बच्चमजी. मी तुम्हाला पुरून उरेन असा विचार करीत केळकरांनी कपाट उघडले. त्यातले रिव्हॉल्व्हर काढून आपल्या पाठीशी पट्ट्यात अडकवले व सावधपणे हळूच दार उघदले. तिसर्‍या मजल्यावरून खालच्या मजल्यावर सरळ जिन्याने जाणे निश्चितच धोक्याचे होते होते. कुलूप लावून ते मागच्या गच्चीत गेले कठड्यालगत असलेल्या भरभक्कम द्राक्षाच्या वेलाने त्यांना धीर आला. वेलावरून खाली उतरताना त्यांचा हात सारखा मागच्या रिव्हाल्व्हरकडे जात होता.

पाठीमागील रिव्हाल्व्हरपेक्षा पोटाशी रिव्हाल्व्हर असणे केव्हाही फायद्याचे. पण केळकरांचे सहा महिन्यांपूर्वीच पोटाचे मोठे ऑपरेशन झाले असल्याने ते उगीचच रिस्क घ्यायला तयार नव्हते. जिवावरच्या दुखण्यातून ते त्यावेळी बचावले होते. . सावकाश खाली उतरून केळकर मागील बाजूने शेजारच्या बिल्डींगमध्ये गेले. तळमजल्यावरच त्यांच्या मित्राचे घर होते. सुदैवाने घरात मित्र एकटाच होता. त्यामुळे केळकरांचे काम सोपे झाले. स्पेशल ड्युटीवरून पहाटे परत आलो व फ्लॅटची किल्ली ऑफिसमध्येच राहिली अशी थाप ठोकून त्यानी मित्राला घडलेल्या प्रसंगाचा थांगपत्ता लागू दिला नाही.

सकाळी रस्त्यात निळी गाडी नाही याची खात्री करून ते आपल्या फ्लॅटवर गेले. कुलुपावरील ओरखड्यावरून कुलुप काढण्याचा प्रयत्न झाला हे त्यांनी ओळखले. दार उघडून आत गेल्यावर पाहिले तो कपाटातील कागदपत्रे काढून ती घाईघाईने परत कोंबून ठेवल्यासारखे वाटत होते. कोणतीही किमती वस्तू गेली नसल्याचे त्यांच्या निदर्शानास आले. नाही म्हणायला त्यांची डायरी मात्र गहाळ झाली होती. त्यांनी लगेच इन्स्पेक्टरना ही नवी डेव्हलपमेंट सांगितली.

ऑफिसमध्ये गेल्यावर लागलीच त्याम्नी सर्व स्टापची अर्जंट मीटींग घेतली व प्रत्यक्ष अटनेचा तपशील न देता सर्वांना जागरूक राहण्याचा आदेश देऊन हेरगिरीची शक्यता असल्याचे सूचित केले. नंतर त्यांनी आपल्या विश्वासू शिपायास बोलावून सर्वांवर बारीक लक्ष ठेवण्यास व काही संशयास्पद दिसल्यास तात्काळ कळविण्यास सांगितले. इन्स्पेक्टर माने यांची प्रत्यक्ष गाठ घ्यायची तयंची इच्छा होती. परंतु माने तातडीने परगावी गेल्याचे त्यांना समजले.

ही घटना होऊन एक महिना झाला तरी अजून काही छदा लागला नव्हता.केळकराम्नी सर्व सहकार्‍यांची संपूर्ण माहिती काढली होती. त्यांना प्रश्न विचारून माहितीची सत्यताही पदताळून पाहिली होती. आता इन्स्पेक्टर माने यांच्याकडे हे प्रकरण सोपवावे ासा विचार करून ते फाईल घेऊन खोलीबाहेर निघाले. तेवढ्यात इन्स्पेक्टर माने स्वतःच येत असल्याचे त्यांना दिसले. ‘ या. मी तुमचीच वाट पहात होतो’ त्यांनी हसून मानेंचे स्वागत केले.पन माने काही बोलले नाहीत. त्यांच्याबरोबर आनखीही कोणी अधिकारी आलेले होते.

माने सरळ केळकरांच्या खुर्चीवरच बसले. केळकर चमकले. केळकर मानेना सीनीअर होते. माने असे काही करतील याची केळकराम्ना कल्पना नव्हती. तरी पन कदाअचित या केसमध्ये माने सर्व सूत्रे हाताळत असल्याने त्यांनी मुख्य खुर्चीत बसणे गैर नाही असे केळकराम्नी मानले व आपली फाईल मानेच्या पुढे ठेवून ते म्हणाले.

‘ हे घ्या. आमच्या ऑपिसचे सर्व रेकार्ड. प्रत्येकाची केस हिस्टरी मी तयार केली आहे. आता पुढचे तुम्ही बघा.’

‘ मूर्खपणा बस्स झाला’ मानेनी मूठ आपटून सांगितले. केळकर चमकलेच. ‘ केळकर, तुम्हाला वाटले आपन सर्वांच्या डोळ्यात फेकून स्वतः नामानिराळे राहू शकू. पण भ्रम आहे तुमचा. भारताचे गुप्तहेर खाते इतके भोळसत नाही हे लक्षात ठेवा. केळकरांच्या डोळ्यापुढे अंधारी आली. ‘ म्हनजे/ माने, तुम्हाला काय म्हणायचे आहे? ’ ‘ हो, तुम्ही स्वतःच हेरगिरी करीत आहात’. केळक्राम्नी इकडे तिकडे पाहिले. बाजूचे अधिकारी काही गडबड केल्यास पकडण्याच्या तयारीत असलेले त्यांना दिसले.

केळकर हसले. ‘ कमाल आहे. मी आणि हेर ? कशावरून निष्कर्ष काढलात तुम्ही हा? आणि मी काही पळून जाणार नाही. त्याची कालजि करू नका.’ मानेनी न बोलता खिशातून डायरी काढून केळकरांपुढे टेबलावर टाकली/ ‘ माझी डायरी? आणि ती तुमच्याकडे कशी आली?’ ‘मीच तुमच्या फ्लॅटवरून ती आनावयास सांगितले होते.’ मानेनी शांतपणे उत्तर दिले. ‘पण का?’

‘कारन आम्हाला फक्त संशय होता. खात्री पटावी म्हणुन दायरी हवी होति.’
‘ मला हे सारे ऎकवत नाही. तरी पण मी हेरगिरी केली असा निष्कर्ष तुम्ही कसा काढलात ते कृपा करून सांगता का जरा.’

‘ तुमच्या डायरीत नोंद असलेल्या प्रत्येक ठिकानच्च्या भेटीचा वृत्तांत अमेरिकेच्या हेरखात्याला समजलेला आहे याची आम्ही माहिती काढली आहे.’

सहा महिन्यांपूर्वी तुम्ही अमेरिकेत मुलाकडे गेला असताना तुमच्याशी तेथील एजंताने संधान बांधले व नंतर प्रत्येक बातमी बाहेर कळू लागली. तसे पाहता कॅप्टन डिसूझाही अमेरिकेस गेले होते. परंतु ज्या मीटीगच्या वेळी डिसूझा नव्हते व फक्त तुम्ही होता त्या मीटींगची माहिटि बाहेर जाते याचा अर्थ काय?’

‘ अहो पण माझ्यावर असा संशय घेण्यापूर्वी तुम्ही इतर सर्व शक्यता पडताळून पाहिल्या का? कदाचित उपग्रहाद्वारेही त्यांनी टेहळणी केली असेल.’ ‘ मिस्टर केळकर. उपग्रहाद्वारे खरी माहिती मिळू नय़े म्हणून आपण कनिष्ठ अधिकार्‍यांना वेगळ्याच ठिकाणी भेटी देण्यास पाठवीत असतो. कोणत्या भेटीवॆळी केळकर जातात हे तिकडे कसे बरोबर समजते ते सांगा’

केळकर हतबुद्धच झाले. ‘ नाही हॊ. माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्याकडून असे नीच कृत्य कधीच होणार नाही’ पण कोणीच ऎकण्याच्या मनस्थितीत नव्हते. केळकरांना मुख्य कार्यालयात हलवून कडेकोट बंदोबस्तात त्यांची उलततपासणी सुरू झाली. सर्व प्रकारचे मार्ग वापरूनही केळकरांच्या तोंडून कबुली येईना. मानसिक त्रासाने ते अस्वस्थ झाले व त्यातच त्यांचे पोटाचे दुखणे उफाळून आले. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. त्यांच्या पोटाची एक्सरे काढून तपासणी करताना त्यांच्या पोटात एक छोटी धातूची पट्टी असल्याचे डॉक्टरांना दिसले. लगेच ऑपरेशन करून ती पट्टी बाहेर काढली गेली.

त्या पट्टीने सर्व रहस्याचा उलगडा झाला. अमेरिकेत पोटाचे ऑपरेशन करताना त्यांच्या पोटात अशी सेन्सॉर चिप गुप्तपणे बसविली होती हे उघड झाले. केळकरांचे अणुशक्ती विभागातील महत्वाचे स्थान कळयामुळे अमेरिकन हेर खात्याने ही कामगिरी केली होती. या चिपमुळे केळकर जेथे जातील तेथील सर्व माहिती अमेरिकेच्या हेर खात्यास पाठवली जात होती. केळकराच्या मुलाला काय प्रत्यक्ष केळकरांनाही याची काहीच माहिती नव्हती हे सिद्ध झाले.

भारताने अमेरिकेकडे अशा कृत्याबद्दल जोरदार निषेध नोंदविला. व सर्व महत्वाच्या व्यक्तींना परदेशात ऑपरेशन करण्यास बंदी घालण्यात आली.

Hits: 51