जोसेफ हेन्री
(जन्म : १७-१२-१७९७, मृत्यू : १८७८)
अमेरिकन भौतिक शास्त्रज्ञ. जन्म न्यूयॉर्क प्रांतातील अल्बनी शहरानजीकच्या खेड्यामध्ये झाला. बालपण अत्यंत दारिद्र्यात गेले. १३ व्या वर्षापर्यंत जेमतेम लिहिता-वाचता येण्यापुरतेच शिक्षण झाले होते, पण नंतर वाचनाची विलक्षण आवड निर्माण होऊन त्यातूनच विज्ञानाची गोडी निर्माण झाली. सतराव्या वर्षी शालेय शिक्षण पूर्ण करून शिक्षकाची नोकरी सुरू केली. स्वत: अनेक प्रयोग करून विद्युत-चुंबकीय प्रवर्तनासंबंधी महत्त्वाचे संशोधन केले. पहिले विद्युत चुंबकीय तत्त्वावर चालणारे तारायंत्र तयार केले, अमेरिकेतील स्मिथसोनियन इन्स्टिट्यूटचा पहिला कार्यवाह. याच्या स्मरणार्थ विद्युत-चुंबकीय प्रवर्तनाच्या एककाला (युनिट) `हेन्री' हे नांव दिले आहे.