खजिन्याची लूट

खेळता खेळता रेल्वेने व मोटारीने भारत दर्शन
प्रा. ह. उ. कुलकर्णी, माजी प्राचार्य(पॉलिटेक्निक), वालचंद कॉलेज, सांगली यांनी १९७९ मध्ये या खेळाची निर्मिती केली व त्याच्या मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत आवृत्या प्रसिद्ध करून १०००० पेक्षा अधिक संचांची विक्री केली. शाळा व दूरदर्शनवर त्यानी या खेळाचे प्रात्यक्षिक सादर केले. त्याकाली मुलांमध्ये हा खेळ फार लोकप्रिय झाला होता.

आता या खेळाचे प्रा. ह. उ. कुलकर्णी यांच्या सहकार्याने वेबरुपांतर करण्याचे ज्ञानदीप फौंडेशनने ठरविले आहे. यामुळे हा खेळ आंतरराष्ट्रीय दर्जावर मान्यता पावेल व त्याद्वारे खेळातून शिक्षण हा हेतू साध्य होईल असे वाटते.

या खेळाविषयी काही माहिती खाली दिली आहे. अधिक माहितीसाठी
प्रा. ह. उ. कुलकर्णी, ’सानिका’, विश्रामबाग, सांगली याचेशी संपर्क साधावा.
रस्ते व रेल्वे मार्गांच्या नकाशाचे नमुने

 

या खेळाची वैशिष्ट्ये
१. भारतातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेश व त्यांच्या राजधान्या, यांची नावे खेळता खेळता पाठ होऊन जातात. व भारतातील त्यांचे अंदाजे स्थान सहजरीत्या दृष्टीपुढे येते.
२. सर्व राजधान्यांच्या शहरांना जोडणारे रेल्वे मार्ग व रस्ते आणि त्यामधील अंदाजे अंतर याची माहिती होते.
३. रेल्वे मार्गावरील सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांची नावेही सहजरीत्या पाठ होऊन जातात.
४. हा खेळ खेळल्यानंतर भारत-यात्रा केल्याचा आनंद अनुभवता येतो.
५. मुलांचे सामान्यज्ञान वाढावे व प्रौढ शिक्षन योजनेला मदत व्हावी याच उद्देशातून हा खेळ निर्माण केला आहे. सर्व वयोगटातील लोकांना या खेळाचा आनंद लुटता येईल.
खास पालकांचेसाठी
हा खेळ पाहिल्यानंतर आपल्या मुलांनी हा खेळ खेळावा असा प्रत्येक पालक आग्रहपूर्वक प्रयत्न करेल इतके शैक्षणिक सामर्थ्य या खेळात दडलेले आहे.



Hits: 82