विज्ञानमहर्षी भास्कराचार्य भाग - २

लीलावती ( पाटीगणित) पुनर्दर्शन
या ग्रंथातील अनुक्रमणिका खालीलप्रमाणे आहे.
या ग्रंथात मूळ लीलावती ग्रंथातील ३३ प्रकरणे आहेत.

पहिल्या प्रकरणाचे नाव परिभाषा असून त्यात कोष्टके दिली आहेत. १२-१२ व्या शतकात चालू असलेल्या नाण्यांचे कोष्टक, सुवर्ण तोलण्याची मापे, लांबीची परिमाणे, धान्य परिमाणे, वेळेची परिमाणे, संख्यास्थान यांची माहिती देणारे संस्कृत श्लोक आहेत. आजच्या घडीला ही परिमाणे वापरात नसल्याने त्याचा या लेखात विचार केलेला नाही.

प्रकरण २ मध्ये संख्यांची स्थानपरत्वे किंमत दाखविणारे श्लोक ११ व १२ खाली दिले आहेत.

एकदशशत्सहस्रायुतलक्षप्रयुतकोट्यःक्रमशः ।
अर्बुदमब्जं खर्वमहापद्मशंकवस्तस्मात् ॥११॥
 
जलधिंचान्त्यं मध्यं परार्धमिति दशगुणोत्तरं संज्ञाः
संख्यायाः स्थानानां व्यवहारार्थ कृता पूर्वेः ॥१२॥

मराठी अर्थ
( उजवीकडून डावीकडे) अनुक्रमाने एकं, दहं, शतं, सहस्र, अयुत ( दशसहस्र), लक्ष, प्रयुत ( दशलक्ष), कोटि, अर्बुद( दशकोटि), अब्ज, खर्व, निखर्व, महापद्म, शंकु, जलधि, अंत्य, मध्य, परार्ध ही संख्यास्थाने आहेत. ह्या प्रत्येक स्थानाची किंमत उजवीकडील स्थानाच्या दसपट आहे. ही मूल्याम्ची ( स्थानपरत्वे) दशमानपद्धति पूर्वाचार्यांनीच सुलभ व्यवहाराठी केली आहे.
वरील श्लोकात सर्वात जास्त संख्या परार्ध ( १०‍ चा १८वा घात) एवढी दिली आहे. मात्र संस्कृत साहित्यात एकूण १०च्या ५४व्या घातापर्यंतच्या संख्यांना नावे आहेत.
Hits: 99